आरोग्य विभाग भरती 2025: आरोग्य विभागाची मेगाभरती! जाणून घ्या सर्व तपशील

आरोग्य विभाग भरती 2025 अंतर्गत 1107 पदांसाठी भरती जाहीर! अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती व सर्व तपशील येथे वाचा. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभागामार्फत आरोग्य विभाग मेगाभरती 2025 अंतर्गत गट-क संवर्गातील 1107 पदांसाठी मोठी भरती सुरू झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, दंत महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये कार्यरत होण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आरोग्य विभागात गट-क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी थेट भरती प्रक्रिया 2025 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरोग्य विभाग भरती 2025: भरतीची महत्वाची माहिती

  • भरती विभाग: वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभाग, महाराष्ट्र शासन

  • एकूण पदसंख्या: 1107

  • अर्ज प्रकार: ऑनलाईन

  • परीक्षेचे स्वरूप: संगणक आधारित (Computer-Based Test)

  • अधिकृत संकेतस्थळ: www.med-edu.in

आरोग्य विभाग भरती 2025: पदांची यादी (पदसंख्या व वेतनश्रेणीसह)

तांत्रिक संवर्गातील पदे (एकूण: 1058 पदे)

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 181 (₹35,400 – ₹1,12,400)

  • ईसीजी तंत्रज्ञ – 84 (₹35,400 – ₹1,12,400)

  • क्ष किरण तंत्रज्ञ – 94 (₹35,400 – ₹1,12,400)

  • आहारतज्ञ – 18 (₹38,600 – ₹1,22,800)

  • औषधनिर्माता – 207 (₹29,200 – ₹92,300)

  • दंत तंत्रज्ञ – 9 (₹29,200 – ₹92,300)

  • प्रयोगशाळा सहायक – 170 (₹21,700 – ₹69,100)

  • ग्रंथपाल – 5 (₹38,600 – ₹1,22,800)

  • सहायक ग्रंथपाल – 17 (₹29,200 – ₹92,300)

  • समाजसेवा अधिक्षक – 135 (₹38,600 – ₹1,22,800)

  • भौतिकोपचार तज्ञ – 17 (₹38,600 – ₹1,22,800)

  • ग्रंथालय सहायक – 13 (₹19,900 – ₹63,200)

  • लेखाकार / ग्रंथसूचीकार – 36 (₹19,900 – ₹63,200)

  • वाहन चालक – 37 (₹19,900 – ₹63,200)

  • क्ष किरण सहायक – 35 (₹21,700 – ₹69,100)

अतांत्रिक संवर्गातील पदे (एकूण: 49 पदे)

  • उच्च श्रेणी लघुलेखक – 12 (₹44,900 – ₹1,42,400)

  • निम्न श्रेणी लघुलेखक – 37 (₹41,800 – ₹1,32,300)

Also Read: DTP Maharashtra Bharti 2025-महाराष्ट्र नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात 154 पदांची भरती

शैक्षणिक पात्रता: आरोग्य विभाग भरती 2025

उमेदवारांनी 10वी, 12वी, संबंधित पदवी, किंवा त्यास समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे. काही पदांसाठी संबंधित अनुभव आवश्यक आहे. 09 जुलै 2025 पर्यंत सर्व पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

  • खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे

  • मागासवर्गीय (SC/ST/OBC/EWS): 18 ते 43 वर्षे

  • इतर प्रवर्गांसाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत आहे.

परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹1000

  • मागासवर्गीय व इतर आरक्षित प्रवर्ग: ₹900
    (हे शुल्क परत न मिळणारे आहे – Non-refundable)

परीक्षा पद्धत:

  • परीक्षा संगणकावर आधारित (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात येईल.

  • प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.

  • प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.

  • प्रत्येक प्रश्नास 2 गुण दिले जातील.

अर्ज प्रक्रिया:

  1. उमेदवारांनी www.med-edu.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

  2. अर्ज 19 जून 2025 रोजी सायंकाळी 5:00 पासून सुरू होतील.

  3. अर्ज करण्याची अंतिम तारीख – 09 जुलै 2025, रात्री 11:55 वाजेपर्यंत.

  4. अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.

अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

महत्वाचे टप्पे:

टप्पा तारीख
अर्ज सुरु 19 जून 2025 सायं. 5:00
अंतिम तारीख 09 जुलै 2025 रात्री 11:55
परीक्षा दिनांक लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल

महत्वाच्या सूचना:

  • भरती संदर्भातील सर्व अपडेट्स www.med-edu.in वर प्रसिद्ध केल्या जातील.

  • उमेदवारांना कोणताही स्वतंत्र ई-मेल किंवा पत्र पाठवले जाणार नाही.

  • अर्ज सादर करताना अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात.

  • भरती प्रक्रियेमध्ये आयुक्तांना परीक्षा स्थगित किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे.

आरोग्य विभाग भरती 2025 ही आरोग्य क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया स्पष्ट दिलेली असून, सर्व इच्छुक उमेदवारांनी 09 जुलैपूर्वी आपला अर्ज निश्चितपणे सादर करावा.

Leave a Comment