Indian Coast Guard Bharti 2025: 590+ पदांसाठी तटरक्षक दलामध्ये भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जून!

Indian Coast Guard Bharti 2025 साठी CGEPT 01/2026 आणि 02/2026 अंतर्गत Navik व Yantrik पदांसाठी एकूण 590+ जागांची भरती सुरू आहे. पात्र उमेदवार २५ जून २०२५ पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. पात्रता, परीक्षा टप्पे, पगार व इतर तपशील येथे पहा.

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Coast Guard Bharti 2025: तटरक्षक दलात नोकरीची संधी!

भारतीय तटरक्षक दलामार्फत (Indian Coast Guard Bharti 2025) Navik (General Duty), Navik (Domestic Branch) आणि Yantrik (Electrical/Mechanical/Electronics) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती CGEPT 01/2026 आणि 02/2026 या बॅचसाठी होत असून, एकूण 590 हून अधिक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जून २०२५ आहे.

Indian Coast Guard Bharti 2025: महत्त्वाचे तपशील

भरती संस्था भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)
भरती प्रकार CGEPT 01/2026 आणि 02/2026
पदांची नावे Navik (GD), Navik (DB), Yantrik
एकूण पदे 590+ (अनुमानित)
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरुवात 11 जून 2025
अर्ज शेवटची तारीख 25 जून 2025
अधिकृत संकेतस्थळ joinindiancoastguard.cdac.in

रिक्त जागांची तपशीलवार माहिती

CGEPT 01/2026:

  • Navik (GD): 260 पदे

  • Yantrik (Mechanical): 30 पदे

  • Yantrik (Electrical): 11 पदे

  • Yantrik (Electronics): 19 पदे

CGEPT 02/2026:

  • Navik (General Duty): 260 पदे

  • Navik (Domestic Branch): 50 पदे

शैक्षणिक पात्रता

  • Navik (GD): 12वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र सह)

  • Navik (DB): 10वी उत्तीर्ण

  • Yantrik: 10वी उत्तीर्ण + संबंधित शाखेतील डिप्लोमा (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम)

Also Read: Postal Life Insurance Bharti 2025– थेट मुलाखतीद्वारे संधी | 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 नुसार)

पद जन्मतारीख
Navik (GD/DB) 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
Yantrik 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008

शासकीय सूट:

  • SC/ST: 5 वर्षे

  • OBC: 3 वर्षे

पगार आणि भत्ते

  • Navik (GD/DB): ₹21,700/- (लेव्हल 3) + DA आणि इतर भत्ते

  • Yantrik: ₹29,200/- (लेव्हल 5) + ₹6,200 Yantrik पे + DA व इतर भत्ते

निवड प्रक्रिया – 4 टप्पे

  1. Stage I: संगणक आधारित परीक्षा (CBT – MCQ स्वरूप, निगेटिव्ह मार्किंग नाही)

  2. Stage II: शारीरिक चाचणी (PFT), कागदपत्र पडताळणी, प्राथमिक वैद्यकीय तपासणी

  3. Stage III: INS Chilka येथे वैद्यकीय चाचणी व अंतिम पडताळणी

  4. Stage IV: अंतिम कागदपत्र पडताळणी व प्रशिक्षणपूर्व प्रक्रिया

Stage I परीक्षेचा अभ्यासक्रम

  • Navik (DB): गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता

  • Navik (GD): वरील विषय + भौतिकशास्त्र

  • Yantrik (शाखेनुसार): Section I + तांत्रिक पेपर (Electrical/Mechanical/Electronics)

शारीरिक चाचणी (PFT)

  • 1.6 किमी धावणे: 7 मिनिटांत

  • 20 उठक बैठक

  • 10 पुशअप

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रम तारीख
अर्ज सुरु 11 जून 2025
अंतिम दिनांक 25 जून 2025
CBT परीक्षा (Stage I) सप्टेंबर 2025
Stage II नोव्हेंबर 2025 / जुलै 2026
प्रशिक्षण सुरुवात फेब्रुवारी 2026 / जुलै 2026

ऑनलाईन अर्ज कसा कराल?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: joinindiancoastguard.cdac.in

  2. नवीन नोंदणी करा

  3. अर्ज फॉर्म भरा

  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  5. शुल्क भरा: ₹300/- (SC/ST साठी शुल्क माफ)

  6. अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या

Indian Coast Guard Bharti 2025 ही केंद्र सरकारच्या संरक्षण क्षेत्रात सेवा करण्याची आणि उत्तम करिअरची संधी आहे. देशसेवेची जिद्द असलेल्या तरुणांनी ही संधी हातची जाऊ देऊ नये. अर्ज अंतिम तारखेपूर्वी नक्की भरा आणि तयारीला लागा.

Leave a Comment